बुधवार, २१ डिसेंबर, २०११

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे

स्वराज्याला लाभला छत्रपती पहिला ......
धन्य धन्य जाहला सवराज्य आमुचा .......

नमला आदिल, निजाम, सिद्धी अन फिरंगी .....
पण माजला औरंग्या जेंव्हा दिवंगले आमचे थोरले महाराज ...

लाखाच सैन्य अन करोडोंचा माज म्हणे तुडवून टाकू स्वराज्य आज .....
तेव्हा गरजला सह्याद्रीचा तरणा छावा ........
"जोवर असेल शिवबाचा छावा तोवर स्वराज्यावर काय करेल औरंग्या दावा ".

लाखो लढले पण मुठभर मराठे पुरून उरले ......
जंजिरा हादरला, चीक्क्देव रडला, गोवा दुभंगला .......
अन औरंग्या ताजविरहित जाहला जेव्हा शिवबाचा छावा गुरगुरला ........

घरभेद्यांची गिधाड गर्दी जमली , अन निसर्गही कोपला ......
चार वरस चा दुष्काळ पडला , स्वराज्य घोड्यावचून ओस पडला ........
स्वराज्य धान्याच्या दाण्यापासून कुपोषित जाहला .........
तरी निधड्या मरहठ्या छाती ताणून उठल्या .........
शंभू राजा तुझ्याकरिता लढता लढता मरू पण स्वराज्य जपू म्हटल्या .......


राजा लढ म्हणतो पण नायक खंद्या ला खांदा लाऊन लढतो .......
असा अमुचा शंभू राजा ,राजा नव्हे तर नायक जाहला .........
मृत्यू नंतरही मृत्युंजय म्हणून जगला .......

...............................................................शिवाजीपुत्र महेंद्र